कि. मो. फडके - लेख सूची

ईश्वराची प्रार्थना तारक की मारक?

असंख्य माणसे रोज अगदी नियमितपणे ईश्वराची प्रार्थना करीत असतात. मात्र अशा माणसांना ईश्वराची प्रार्थना का करावीशी वाटते, याची अनेक कारणे संभवतात. कोणी भाविक माणसे म्हणतील, की आम्ही अमुक एका धर्माचे प्रामाणिक अनुयायी असल्यामुळे, आमच्या ईश्वराची प्रार्थना करणे, हे आमचे पवित्र कर्तव्यच आहे. दुसरी कोणी माणसे म्हणतील, की आमच्या मनातील अनेक कामना ईश्वराची आराधना करून यथावकाश …

मानसोपचार आणि सामाजिक परिवर्तन 

प्रस्तुत लेखाचे केवळ शीर्षक वाचूनच काही वाचकांनी आपल्या भुवया उंचावल्या, तर त्यामुळे कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण त्यांच्या मनात असे प्रश्न गर्दी करू लागले असतील, की मानसोपचार आणि सामाजिक परिवर्तन या दोन प्रक्रिया इतक्या भिन्न असताना त्यांना एकाच दावणीला बांधण्याचे धाडस करणे म्हणजे अकारण नसता उपद्व्याप करणे नव्हे काय? सामाजिक परिवर्तनाच्या समस्येची चर्चा आजपर्यंत …

असहिष्णुतेचे दुर्लक्षित परिणाम

जवळजवळ सर्व जगात धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवाद यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक विचारवंत या दोन्ही अनर्थकारक घटनांची चिकित्सा करून त्यांना प्रतिबंध कसा घालावा, याविषयी अभ्यासपूर्ण लेखन करीत असतात. या विचारवंतां-मध्ये समाजशास्त्रज्ञ, विज्ञानाचे अभ्यासक, पत्रपंडित, राजकीय मुत्सद्दी, विविध धर्मांच्या अनुयायांचे नेतृत्व करणारे धुरीण, इत्यादींचा समावेश असतो. परंतु अशा विचारवंतां-मध्ये मानसोपचारतज्ज्ञ सामील झालेले क्वचितच दृष्टोत्पत्तीस येते. …

शालेय शिक्षण – एक अभिनव प्रयोग (उत्तरार्ध)

भावनिक आरोग्याच्या शिक्षणाचे स्वरूप वरील पद्धतीने प्रशिक्षण घेतलेले शिक्षक ‘द लिव्हिंग स्कूल’ मधील मुलांना भावनिक आरोग्याविषयी जे शिक्षण देत असत, त्यात मुख्यतः कोणत्या संकल्पनेचा समावेश करण्यात आला होता, ते पाहू. या संदर्भात प्रथम असे स्पष्टपणे नमूद करावयास हवे, की मुलांना भावनिक आरोग्याचे शिक्षण देताना शिक्षक विवेकनिष्ठ मानसोपचारातील एका मूलभूत संकल्पनेवर भर देत असत. आणि वस्तुतः …

शालेय शिक्षण – एक अभिनव प्रयोग (पूर्वार्ध)

प्रयोगाच्या संकल्पनेचा उदय सुविख्यात अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस त्यांच्याकडे येणाऱ्या मनोरुग्णांवर अधिकाधिक परिणामकारक रीतीने मानसोपचार करण्यासाठी जे प्रयोग करून पाहत होते, त्यांमधून १९५५ साली एक नवे मानसोपचारशास्त्र उदयाला आले. त्याला विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र असे म्हणता येईल. त्या शास्त्राचा विकास व प्रसार करण्यासाठी डॉ. एलिस यांनी १९५९ साली न्यूयॉर्क शहरातील आपल्या राहत्या घरातच एका संस्थेची स्थापना …